संस्कृत भाषेचे सौंदर्य : सुभाषितांमधील राम 

रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः ।
सोपानमार्गेण करोति शब्दं ठाठं ठठण्ठं ठठठं ठठण्ठः ॥

अर्थ : रामाच्या अभिषेकाच्या वेळी पाणी आणतांना एका तरुणीच्या हातातील सोन्याचा घडा खाली पडला (आणि) (तो) जिन्यावरून ठाठं ठठंठं ठठठं ठठंठः असा आवाज करत गेला.

रामनाम सद्विद्या

सद्विद्या यदि का चिन्ता वराकोदरपूरणे ।
शुकोऽप्यशनमाप्नोति रामरामेति च ब्रुवन् ॥

अर्थ : जर माणसाजवळ चांगली विद्या असेल, तर क्षुद्र पोट भरण्याची काळजी कशाला ? पोपटसुद्धा ‘राम राम’ असे म्हणून अन्न मिळवतो.