Eric Adams Ram Temple : भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, म्हणजे हिंदूंसाठी आध्यात्मिक उन्नती करून घेण्याची संधी !

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स  

एरिक अ‍ॅडम्स

न्यूयॉर्क (अमेरिका) – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात नुकतीच श्री दुर्गामातेची पूजा करण्यात आली. या वेळी न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे उपायुक्त दिलीप चौहान उपस्थित होते. श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याविषयी बोलतांना महापौर एरिक अ‍ॅडम्स म्हणाले की, न्यूयॉर्कमधील हिंदु समुदायासाठी हा सोहळा फार महत्त्वाचा आहे. हा सोहळा त्यांच्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याची, तसेच आध्यात्मिक उन्नती करून घेण्याची संधी आहे, असे अ‍ॅडम्स यांनी म्हटले आहे.

श्रीराममंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे न्यूयॉकमधील ‘टाईम्स स्क्वेअर’ येथे थेट प्रक्षेपण !


२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध ‘टाईम्स स्क्वेअर’ येथे करण्यात येणार आहे.

हे पण वाचा : सनातन प्रभात
अमेरिकेतील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअर परिसरात श्री रामललाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवणार !