आजच्या परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संपूर्ण भारतात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अहिल्याबाई यांच्या काळातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली, तर आजही त्यांनी बनवलेल्या विहिरी लोकांना पाणी पुरवत आहेत. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेले तलाव, पाण्याचे कुंड यांना सरकारच्या साहाय्याने विकसित केले पाहिजेत. आपण त्यांनी उभारलेली मंदिरे, विहिरी, कुंड, तलाव यांची देखभाल केली, तर एक शासक कसा असावा, हे येणार्या पिढीला शिकायला मिळेल. आम्ही हा इतिहास येणार्या पिढीला सांगितला नाही, तर आपली संस्कृती आपण गमावून बसू. त्यामुळे आपल्या महापुरुषांविषयी आपली मुले आणि कुटुंब यांना जागृत करणे आवश्यक आहे.