सप्टेंबर २०२३ मध्ये देहलीत आयोजित ‘जी-२०’ परिषदेच्या वेळी विमान झाले होते नादुरुस्त !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची मान पुन्हा एकदा लज्जेने झुकली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात ‘जी-२०’ परिषदेला उपस्थित झाल्यानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळी त्यांचे अधिकृत विमान नादुरुस्त झाले होते. त्यामुळे त्यांना देहलीत ३६ घंटे थांबावे लागले होते. आता अशीच पाळी जमैकामध्ये असतांना त्यांच्यावर आली. २६ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत ते त्यांच्या कुटुंबियांसमवेत सुट्ट्यांसाठी जमैकामध्ये गेले होते. त्या वेळी त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना थांबून रहावे लागले.
सौजन्य इंडिया टूडे
ट्रुडो यांचे विमान ३४ वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. दुसरे विमान बनवण्यासाठी काही वर्षे लागतील. याआधी केवळ देहलीच नाही, तर त्याआधीही ट्रुडो यांचे विमान नादुरुस्त झाले होते. वर्ष २०१६ मध्ये बेल्जियमला जातांना त्यांचे विमान नादुरुस्त झाले. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांच्या विमानाला लहान अपघात झाला होता. डिसेंबर २०१९ मध्ये ‘नाटो’ देशांच्या शिखर परिषदेला जात असतांनाही ट्रुडो यांना त्यांच्या ‘बॅकअप’ विमानाचा वापर करावा लागला होता. गंमत म्हणजे नंतर त्यातही बिघाड झाला.