संस्कृत भाषेचे सौंदर्य : वैद्यांसंबंधित सुभाषिते

वैद्यावर निष्ठा असल्यास रोगी बरा होणे

मन्त्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ ।
यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी ॥

– विक्रमचरित, श्लोक ६४

अर्थ : मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, ज्योतिषी, वैद्य आणि गुरु यांच्यावर ज्याची जशी श्रद्धा असेल, तसे त्याला फळ मिळते.

– विक्रमचरित, श्लोक ६४


श्रेष्ठ वैद्य ईश्वरच असणे

औषधं जान्हवीतोयं वैद्यो नारायणो हरिः । 

अर्थ : गंगेचे पाणी हेच खरे औषध आणि भगवान विष्णु हेच खरे वैद्य.


गुरु आणि ईश्वर या वैद्यांना शरण जावे !

ब्रह्मरस घेईं काढा । जेणें पीडा वारेल ।
पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥

– तुकाराम गाथा, अभंग १३८३, ओवी १ आणि २

अर्थ : अरे, तू ब्रह्मरसाचा काढा घे, म्हणजे त्या योगाने तुझी जन्मादी पीडा निवारण होईल. त्याला पथ्य विठोबारायाचे नाम वाचेने घेणे हे होय.

स्पष्टीकरण : भवरोगावर ब्रह्मज्ञान हे औषध आणि वाचेने पांडुरंगाचे नाव घेणे हे पथ्य. नंतर भवरोग जाईल; म्हणून अशा वैद्याला शरण जावे.

– तुकाराम गाथा, अभंग १३८३, ओवी १ आणि २