MP Missionary School : देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे ख्रिस्ती प्रार्थना !

  • हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा होत आहे प्रयत्न !

  • १० वर्षांखालील मुलांकडून स्वच्छ करून घेतले जात आहे शौचालय !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो विद्यार्थ्यांसमावेत

नवी देहली – मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवले जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सामाजिक माध्यमांतून दिली. ‘याद्वारे या मुलांना ख्रिस्ती बनवण्याचे काम चालू असून या शाळांना प्रभावशील लोकांचे साहाय्य मिळत आहे’, असा दावाही त्यांनी केला. कानुनगो यांनी या दोन्ही शाळांना भेट दिल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली.

कानुनगो पुढे म्हणाले की, या शाळेतील सर्व विद्यार्थी हिंदु आहेत. त्यांना ख्रिस्त्यांच्या सर्व प्रार्थना पाठ आहेत. १० वर्षांपेक्षा अल्प वयाच्या विद्यार्थ्यांकडून गवत कापून घेतले जात असून शौचालयही स्वच्छ करून घेतले जात आहे. या शाळांना विदेशातून अर्थपुरवठा होत असल्याचे आढळले आहे. या शाळांचे राजकीय लोकांशी संबंध आहेत. यातून हे स्पष्ट आहे की, येथील ‘प्रभावशाली’ लोकांचा वापर करून हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात मध्यप्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात गेली अनेक वर्षे भाजपचे सरकार असूनही अशा गोष्टी कशा चालू राहू शकतात ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! अशा घटना तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !