महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील अतिक्रमणांची पडताळणी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम्.आय.डी.सी.) क्षेत्रात झालेल्या अतिक्रमणांची पडताळणी करू. या पडताळणीतून आलेल्या वस्तूस्थितीतून अनधिकृत बांधकामे आणि अवैध वृक्षतोड यांविषयी सर्वंकष असे धोरण निश्चित करण्यासाठी येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

नवी मुंबई येथील ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्रातील शेकडो वृक्षांची तोडणी करणार्‍यांवर कारवाई करण्याविषयीचा प्रश्न आमदार रमेश पाटील यांनी उपस्थित केला. त्या वेळी मंत्री सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.