|
रांची (झारखंड) – गुमला ठाणा क्षेत्रातील फोरी गावात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात आले आहे. येथील आदिवासी समुदायातील एका हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नंतर तिची हत्या करून तिच्या शरिराचे अनेक तुकडे केले गेले. फोरी गावातील २ वेगवेगळ्या विहिरीतून पोलिसांनी मृत मुलीचे डोके आणि धड जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी इमान मिरदहा उर्फ बादल आणि झहीर मिरदहा या २ मुसलमान तरुणांना अटक केली आहे.
पोलिसांना विहिरीत सापडलेल्या पिशवीत मृत मुलीचे आधारकार्ड आणि एटीएम् कार्ड मिळाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. मृत मुलीच्या वडिलांनी मृतदेह त्यांच्या मुलीचा असल्याचे ओळखले. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, फोरी गावातील बादल नावाच्या एका मुसलमान तरुणाने त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. बादल याने त्याच्या इतर साथीदारांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला आणि पुरावे लपवण्यासाठी तिचे डोक आणि धड वेगवेगळ्या विहिरीत टाकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी इमान मिरदहा उर्फ बादल आणि झहीर मिरदहा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांधावर प्रेम करणे; म्हणजे स्वतःला मरणाच्या खाईत लोटणे, हे हिंदु मुलींना समजेल, तो सुदिन ! |

अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !