श्रीराममंदिराच्या पुजार्‍याला अश्‍लील रूपात दाखवणार्‍या काँग्रेस नेत्याला अटक !

डावीकडून पुजारी मोहित पांडे आणि हितेंद्र पिठाडिया

कर्णावती (गुजरात) – अयोध्येत बांधल्या जाणार्‍या श्री रामलल्लाच्या भव्य मंदिरासाठी नवनियुक्त पुजारी मोहित पांडे यांचे बनावट आणि अश्‍लील छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याविषयी आणि त्यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तव्य प्रसारित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी काँग्रेसचे नेते हितेंद्र पिठाडिया यांना कर्णावती पोलिसांनी अटक केली.

हितेंद्र पिठाडिया हे गुजरात काँग्रेसच्या अनुसूचित आघाडीचे अध्यक्ष असून आमदार जिग्नेश मेवानी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी ‘एक्स’वर एक छायाचित्र प्रसारित केले असून त्यामध्ये एक पुरुष एका महिलेसमवेत असभ्य अवस्थेत दाखवला आहे. या व्यक्तीने टिळा आणि चंदन लावले आहे. हितेंद्र पिठाडिया यांनी दावा केला आहे की, हे श्रीराममंदिराचे नवनियुक्त पुजारी मोहित पांडे असू शकतात; कारण समोर आलेल्या छायाचित्रामध्ये त्यांनीही चंदन आणि टिळा लावला होता.

सामाजिक प्रसारमाध्यमांवर झालेल्या तीव्र विरोधामुळे पिठाडिया यांनी नंतर हे चित्र काढून टाकले. पिठाडिया यांनी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोचवला असून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी हिंदूंनी केली. यानंतर कर्णावती पोलिसांनी हितेंद्र पिठाडिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसचा पराकोटीचा हिंदुद्वेष ! काँग्रेसचे नेते केवळ हिंदूंच्याच संदर्भात असे धाडस दाखवू शकतात; कारण हिंदू अहिष्णु आहेत. काँग्रेसवाल्यांनी असे कृत्य अन्य पंथियांच्या संदर्भात दाखवले असते, तर त्यांचे काय हाल झाले असते, हे वेगळे सांगायला नको !