अमरावती येथे गुन्हेगारांना शस्त्रविक्री करणार्‍या टोळीला अटक !

  • ६ धर्मांधांचा समावेश

  • २ देशी कट्ट्यांसह १०२ खंजीर आणि चाकू असा घातक शस्त्रसाठा जप्त

अमरावती – शहरातील गुन्हेगारांना शस्त्रविक्री करणार्‍या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ देशी कट्ट्यांसह १०२ खंजीर आणि चाकू जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी काही शस्त्रे जप्त होण्याची शक्यता आहे. टोळीप्रमुख अकरम खान उपाख्य गुड्डू वल्द बादुल्ला खान (वय १९ वर्षे), फरदीन खान युसूफ खान (वय २१ वर्षे), मुजम्मील खान जफर खान (वय २१ वर्षे), शेख सुफीयान महंमद अशफाक (वय १९ वर्षे), अब्दुल सोहेल अब्दुल शफी (१९) आणि जाहेद शहा हमीद शहा (वय २० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

१. शस्त्रविक्री करणार्‍या टोळीमधील सदस्य स्वत:जवळ चाकू बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारावर गुन्हे शाखेने सापळा रचून अब्दुल सोहेल याला अटक केली. त्याच्याकडून १ खंजीर आणि २ चायना चाकू जप्त केले.

२. चौकशीत त्याने टोळीप्रमुखासह इतरांची नावे सांगितली. त्यानुसार टोळीप्रमुख अकरम खान उपाख्य गुड्डू, फरदीन खान, मुजम्मील खान, शेख सुफियान आणि जाहेद शहा यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

३. चौकशीत आरोपी मुंबईवरून शस्त्रांची मागणी करून त्याची शहरातील गुन्हेगारांना विक्री करत असल्याचे समोर आले. आरोपींच्या चौकशीतून शहरातील शस्त्र बाळगणार्‍या अनेक गुन्हेगारांची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखी शस्त्रे जप्त होण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका 

शस्त्रे बाळगून समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !