खलिफाकडून आतंकवादी संघटनेशी एकनिष्ठ रहाण्याची तरुणांना शपथ !
ठाणे – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ डिसेंबर या दिवशी घातलेल्या धाडींमध्ये १५ जणांना अटक केली. या आरोपींमध्ये ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेच्या नेत्याचाही समावेश होता. साकिब नाचन याने अन्य सदस्यांना ‘बयाथ’ म्हणजेच संघटनेसाठी एकनिष्ठ रहाण्याची शपथ दिली होती. तो भिवंडीतील पडघा गावचा ‘खलिफा’ होता. त्या सर्वांनी मिळून पडघा गावाला ‘अल् शाम’ म्हणजेच ‘मुक्तक्षेत्र’ घोषित केले होते. पडघा येथे इसिसचे मोठे जाळे निर्माण करण्यासाठी तो प्रभावशाली मुसलमान तरुणांना त्यांचे घर सोडून येथे येण्याचे प्रोत्साहन देत होता.
संपादकीय भूमिका
|