दोघा नेपाळी नागरिकांना तेथील न्यायालयाने ठरवले दोषी !

  • भारतात बाँबस्फोट करण्याचा केला होता प्रयत्न !

  • २ भारतीय नागरिकांची केली होती हत्या !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या न्यायालयाने समदुल होदा आणि बृज किशोर गिरि या दोघांना आतंकवादी कारवायाचा कट रचल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले. पुढील सुनावणीमध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या दोघांनी ७ वर्षांपूर्वी भारतातील एका रेल्वे गाडीमध्ये बाँब ठेवला होता; मात्र तांत्रिक अडचणीमुळे तो फुटला नव्हता. यामुळे होदा याने दोघा भारतीय नागरिकांची हत्याही केली होती. होदा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हस्तक आहे. दुबईमध्ये रहात असतांना होदा एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात आला होता. त्यानेच होदा याला आतंकवादी कारवायांमध्ये ओढले. आय.एस्.आय. होदा याला पैसे देत होती.