इंफाळ (मिझोराम) – मिझोराममध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी ४ डिसेंबरला सकाळपासून प्रारंभ झाली. ४० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेड.पी.एम्.) या पक्षाला २९ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एम्.एन्.एफ्.) या पक्षाला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस १ जागांवर, तर भाजप ३ जागांवर आघाडीवर आहे.
झोराम पीपल्स मूव्हमेंटचे नेते लालदुहोमा आहेत. लालदुहोमा हे माजी आय.पी.एस्. (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सुरक्षा त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पक्षाने दुसर्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. २०१८ मध्ये त्यांच्या पक्षाला ८ जागा मिळाल्या होत्या.