सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्यातील गुणांचे दर्शन घडले. सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन

१ अ. नम्रता : साधकांचे अनुभव आणि अनुभूती ऐकून परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना नमस्कार करत होते. त्या वेळी वाटले, ‘केवढी ही नम्रता !’

१ आ. प्रीती

१ आ १. साधकांना लवकर जायचे असतांना सत्संगाच्या नियोजनात पालट करणे : एका साधक कुटुंबियांना काही कारणांमुळे सत्संगातून लवकर जायचे होते. त्यामुळे गुरुदेवांनी सत्संगातील नियोजनात पालट करून सूक्ष्म प्रयोग आणि दैवी बालकांची चर्चा, हे सत्र सत्संगाच्या शेवटी असतांनाही आरंभी घेतले. यातून गुरुदेवांची साधकांवरील प्रीती अनुभवता आली. त्या वेळी ‘प्रसारातील साधकांचा विचार करून तारतम्याने नियोजनात पालट करता यायला हवेत’, हे मला शिकायला मिळाले.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

१ आ २. परात्पर गुरु डॉक्टर ‘अनेक उपचारपद्धती एकत्र करून साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास लवकरात लवकर दूर व्हावेत’, यासाठी संशोधन करत आहेत. यातून त्यांची साधकांवरील प्रीती अनुभवायला येते.

१ आ ३. साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात नेणे : सत्संगात साधक बोलत असतांना ‘सूक्ष्म गंधात कशी वाढ होते ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना अभ्यासायला सांगितले. तेव्हा ‘ते साधकांना स्थुलातून सूक्ष्माकडे नेत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या संकल्पाने साधकांना अंतर्मुख होता येऊन सर्वांना ते अनुभवता आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. जे साधनेच्या संदर्भात काही ऐकत नाहीत किंवा ज्यांना साधना आवडत नाही, त्यांना साधनेविषयी काही सांगण्यात वेळ घालवू नये.

आ. ज्यांची ईश्वरावर दृढ श्रद्धा आहे, त्यांचे आपत्काळात रक्षण होणारच आहे.

इ. एका साधिकेने सांगितले, ‘‘माझ्यात समष्टीसाठी नामजप करण्याची पात्रता आहे का ?’, असा विचार येतो.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘नामजप केल्याने आपल्यात ती पात्रता निर्माण होते.’’ तेव्हा ‘ईश्वरचरणी पात्र होण्यासाठी नामजप करायला पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले.

ई. साधकांमधील वेगवेगळ्या प्रकारचे भाव आणि त्यांचे समर्पण अनुभवता आले.

उ. दैवी बालकांचे प्रारब्ध अधिक नसल्याने ती साधनेत लवकर पुढे जाऊ शकतात.

३. सत्संगात आलेल्या अनुभूती

अ. संपूर्ण सत्संगात साधकांचे प्रयत्न ऐकून शिकण्याच्या स्थितीत रहाता आले. साधक प्रगती करत आहेत. गुरुदेव सर्वांनाच पुढे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे पुष्कळ आनंद मिळाला.

आ. सत्संगात दैवी सुगंध येत होता.

इ. ‘सत्संगात प्रकाश वाढत आहे’, असे जाणवून कृतज्ञता वाटली.

ई. सत्संगातील सर्व साधकांचा कृतज्ञताभाव वाढला होता. त्यामुळे वातावरण आनंददायी आणि हलके झाले होते.

उ. दैवी बालके बोलत असतांना वातावरणातील गारवा वाढला होता आणि माझा भाव जागृत होत होता.

गुरुदेवांनी सत्संगातून आम्हा सर्वांनाच आनंद दिला. त्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

(हे लिखाण श्रीमती मंदाकिनी डगवार संत होण्याच्या पूर्वीचे असल्याने त्यांच्या नावापूर्वी ‘पूज्य’ असे लिहिले नाही.- संकलक)

– श्रीमती मंदाकिनी डगवार (आताच्या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार), वर्धा (२.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक