काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणी दूतावासाचे कामकाज लवकरच राजधानी नवी देहलीत पुन्हा चालू होणार आहे. तालिबानचे उपपरराष्ट्रमंत्री शेर महंमद अब्बास स्टॅनिकझाई यांनी हा दावा केला आहे. ‘भाग्यनगर (हैदराबाद) आणि मुंबई येथील वाणिज्य दूतावासातील अधिकार्यांनी काबुलच्या सूचनेनंतर देहली दूतावासाला भेट दिली आहे’, असे स्टॅनिकझाई यांनी सांगितले. स्टॅनिकझाई यांच्या वक्तव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. भारताने अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानच्या सरकारला अद्याप मान्यता दिलेली नाही.