Life On Mercury : बुधावरही जीवसृष्टी शक्य ! – नासा

सूर्यापासूनचा सर्वात जवळच्या बुध ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता – ‘नासा’चे संशोधन

वॉशिंग्टन (अमेरिका) – सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह असलेल्या बुधावर जीवसृष्टी असू शकते, असा दावा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी केला आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, बुध ग्रह सूर्याच्या अगदी निकट असल्याने त्याचे क्षेत्र प्रचंड उष्ण आहे. अशा स्थितीत तेथे जीवसृष्टीची कल्पनाही करता येत नाही; मात्र ‘प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट’च्या शास्त्रज्ञांनी बुधाच्या पृष्ठभागावर खारट हिमनद्यांचे पुरावे सापडल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत तेथे जीवसृष्टीची आशा निर्माण झाली आहे.

सूर्याच्या जवळ असल्यामुळे बुधावरील दिवसाचे कमाल तापमान ४३० अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. रात्रीचे तापमान १८० अंशांवर येते. बुधाच्या पृष्ठभागावर पडणार्‍या प्रकाशामुळे निर्माण होणारी उष्णता रोखू शकेल, असे कोणतेही वातावरण तेथे नाही.