रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. सौ. वृंदा अजय मुक्तेवार (महिला शहर प्रमुख, शिवसेना), अमरावती

अ. ‘आश्रमात पोचताच माझ्यात नवचैतन्य निर्माण झाले.

आ. आश्रम पाहून माझ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

इ. माझ्या मनातील उत्साह द्विगुणीत झाला, तसेच माझे मन प्रसन्न होऊन माझी आध्यात्मिक ओढ वाढीस लागली.’

२. श्री. विनीत दि. पाखोडे (अध्यक्ष, श्री पिंगळादेवी संस्थान, नेर पिंगळाई), अमरावती.

अ. ‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्यावर मी प्रत्यक्ष अनुभवले.

आ. हा आश्रम पुष्कळ चैतन्यमय आहे.’

३. अधिवक्ता गजानन य. फडतरे, मु. खातवळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमात यायला मिळणे’, हे माझे परम भाग्यच आहे.

आ. येथील साधकांची सेवा प्रशंसनीय आहे. ‘ती अशीच निरंतर चालू रहावी आणि ईश्वराने मला परत आश्रमात येण्याची संधी द्यावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !’

४. सौ. स्मिता उ. रानडे, रामेश्वरी, नागपूर, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमाचे कामकाज बघून मला पुष्कळ प्रसन्न वाटले. आश्रमातील शिस्त आणि साधकांची सेवा बघून मला वेगळीच अनुभूती आली.

आ. आम्हाला पुष्कळ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा असलेल्या आश्रमाला भेट देता आली. त्यामुळे आम्ही कृतकृत्य झालो.’

५. श्री. निखिल अंबिलवादे, जिल्हा जालना

अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद मिळाला, तसेच साधना करण्यासाठी ऊर्जा मिळाली. गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

६. मानसी म. कोठावळे, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले आणि शिकायला मिळाले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : जून २०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक