कणकवली (सिंधुदुर्ग) येथील कु. जिगिषा म्‍हापसेकर हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या विविध अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
कु. जिगिषा म्‍हापसेकर

१. रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना आश्रमावर सुदर्शनचक्र फिरत असून त्‍याचे संरक्षककवच संपूर्ण आश्रमाभोवती असल्‍याचे अनुभवता येणे :

‘मी रामनाथी आश्रमात येतांना माझ्‍याकडून प्रार्थना होत होती, ‘मला आश्रमातील चैतन्‍य ग्रहण करता येऊ दे आणि येथील चैतन्‍याने मला आध्‍यात्मिक लाभ होऊ दे.’ आश्रमात प्रवेश करतांना ‘आश्रमावर सुदर्शनचक्र फिरत असून त्‍याचे संरक्षककवच पूर्ण आश्रमाभोवती आहे’, असे मी अनुभवले.

२. शिबिराच्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या  संदर्भात आलेल्‍या अनुभूती

अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ व्‍यासपिठावर बसल्‍यावर त्‍यांच्‍याकडे बघताच माझे मन निर्विचार होऊन माझा आपोआप ‘श्री दुर्गादेव्‍यै नमः।’, असा नामजप चालू झाला.

 आ. त्‍या वेळी ‘साक्षात् दुर्गामाता समोर आहे’, असे मला वाटले.

इ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी लावलेल्‍या कुंकवातून एक वेगळीच शक्‍ती प्रक्षेपित होत होती.

ई. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या सत्‍संगामुळे माझ्‍या मनातील सगळे विचार, होणारा संघर्ष आणि नकारात्‍मकता सगळे काही दूर झाले.

परात्‍पर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या चरणी कृतज्ञता !’

– कु. जिगिषा दर्शन म्‍हापसेकर(वय १८ वर्षे), कणकवली, सिंधुदुर्ग. (२८.१०.२०२२)