कराची (पाकिस्तान) – पाकिस्तान आणि चीन यांच्या नौदलांनी १२ नोव्हेंबरपासून अरबी समुद्रामध्ये कराची जवळील सागरी सीमेत युद्धसरावास प्रारंभ केला. ‘सी गार्डियन-३ संयुक्त समुद्री अभ्यास’ असे याला नाव देण्यात आले आहे. ९ दिवस हा युद्धसराव चालणार आहे. या संदर्भात चिनी नौदलाचे कमांडर आणि या युद्धसरावाचे दायित्व असणारे रियर अॅडमिरल लियांग यांग यांनी सांगितले की, हा युद्धसराव प्रत्येक मोसमामध्ये रणनीतीच्या दृष्टीने सहकार्य वाढवणारा ठरणार आहे.