लेपचा (हिमाचल प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील चीन सीमेपासून २ कि.मी. अंतरावरील इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या तळावर जाऊन दिवाळी साजरी केली. त्यांनी ट्वीट करत म्हटले, ‘मी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे शूर सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे.’ गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
Spending Diwali with our brave security forces in Lepcha, Himachal Pradesh has been an experience filled with deep emotion and pride. Away from their families, these guardians of our nation illuminate our lives with their dedication. pic.twitter.com/KE5eaxoglw
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी सियाचीनला गेले होते. मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करतांना ‘देशातील सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा’, असे म्हटले आहे.
देश के अपने सभी परिवारजनों को दीपावली की ढेरों शुभकामनाएं।
Wishing everyone a Happy Diwali! May this special festival bring joy, prosperity and wonderful health to everyone’s lives.
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023