छत्रपती संभाजीनगर – दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी गडाला १० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच भारतीय पुरातत्व विभागाने तातडीने अग्नीशमन विभाग आणि पोलीस प्रशासन यांना बोलावले होते; परंतु आग गडाच्या मधोमध लागल्यामुळे ती आटोक्यात आणण्यात यश आले नाही. ५ घंट्यांत आगीने गडाला पूर्ण वेढा घातला. पोलीस आणि गड कर्मचारी यांनी पर्यटकांना सुखरूप गडाखाली आणले.
दौलताबाद गडाचे साहाय्यक संरक्षण विभागाचे अधिकारी आर्.बी. रोहनकर म्हणाले की, डोंगर परिसरात वाढलेल्या गवताजवळ पर्यटकाने सिगारेट किंवा इतर पदार्थ पेटवतांना ठिणगी पडते. त्यानेच आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.