रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. सुरेश जोग (संचालक, जे स्क्वेअर प्रॉपर्टी), शीव, मुंबई, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून माझ्या ज्ञानात भर पडली. माझी सकारात्मकता वाढली. आश्रमात पुन्हा यायची माझी इच्छा आहे.’

२. श्री. नाथ नारायण देसाई (तालुका महासचिव, भाजप), तालुका आजरा, कोल्हापूर.  

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ समाधान वाटले.

आ. मला प्रसन्नता आणि आत्मिक शांतता वाटली.

इ. ‘सर्व साधक करत असलेले हे कार्य प्रेरणादायी आहे’, असे माझ्या लक्षात आले.’

३. डॉ. संभाजी बन्ने, कोल्हापूर

अ. आश्रम पाहून ‘इथेच रहावे आणि स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या सेवेत वाहून घ्यावे’, असे मला वाटत आहे.

आ. एवढा चांगला, सर्व सोयींनी युक्त, तसेच भक्तीमय आणि आध्यात्मिक आश्रम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.’

४. श्री. अनिल सोमा चौधरी (जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, श्री योगवेदांत सेवा समिती), जळगाव

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला.

आ. माझ्या मनाला नवचैतन्य मिळाले.’

५. डॉ. प्रज्ञा जंगले (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका), जळगाव

अ. ‘रामनाथी आश्रमात वेगवेगळ्या विषयांवर चालू असलेल्या संशोधनात्मक अभ्यासामुळे ‘साधनेची आवश्यकता आहे’, याची मला जाणीव झाली.

आ. आश्रमाच्या वतीने चालू असलेल्या संस्कृतीरक्षणाच्या कार्याला आणि साधकांना प्रणाम !’

६. अधिवक्ता दत्तात्रय सणस (प्रमुख कार्यवाह, हिंदू महासभा, महाराष्ट्र कार्यकारिणी), सातारा

अ. ‘रामनाथी आश्रमातील मांडणी अप्रतिम आहे.

आ. येथे सनातन धर्माचे दर्शन घडते.

इ. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे.

ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य अवर्णनीय आहे. आश्रमातील सेवा करणार्‍यांचे कार्य पाहून त्यांच्या कार्यास कोटी कोटी नमस्कार !’

७. श्री. राजेंद्र शंकर शिंदे (शहर प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), महाबळेश्वर, सातारा.

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून माझ्या मनाला शांती वाटली, तसेच माझे मन प्रसन्न झाले. येथे मला साक्षात् संतांचे दर्शन झाले.’

८. श्री. संदीप अनिल मालपेकर (अध्यक्ष, राजापूर तालुका व्यापारी संघ), जिल्हा रत्नागिरी

अ. ‘आश्रमातील आध्यात्मिक वातावरण पाहून माझ्या मनाचे समाधान झाले.

आ. ‘आपण वर्षभर वेगवेगळ्या सणांनिमित्त आणि उत्सवांनिमित्त दिलेल्या निधीचा योग्य वापर होतो’, याचे मला समाधान वाटले.’

९. श्रीमती प्रभा ल. अनंतवार, नागपूर.

अ. ‘रामनाथी आश्रम एकदम सुंदर आहे. येथील वातावरण अध्यात्मात भर पाडणारे आहे. त्यामुळे मी भारावून गेले.

आ. मला गुरूंची एकदम आठवण झाली. त्या वेळी ‘ते समोरच आहेत. त्यांच्या कृपादृष्टीने आपण हे सर्व बघत आहोत’, याची मला जाणीव झाली. आता ‘या अध्यात्मदृष्टीतून माझी पुष्कळ प्रगती व्हावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक