४ मासांतील ही तिसरी घटना

औरंगाबाद (बिहार) – बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील अमझरशरीफ पंचायत क्षेत्रातील श्री हनुमान मंदिरात समाजकंटकांनी मांस फेकल्याची घटना नुकतीच समोर आली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने तेथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या मंदिरात मांस फेकण्याची ही ४ मासांतील तिसरी घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच दौडनगरचे उपजिल्हाधिकारी मनोज कुमार आणि पोलीस उपअधीक्षक कुमार ऋषीराज यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोचले.
ग्रामस्थांना संयम बाळगण्याचा सल्ला देण्यासह आरोपींना अटक करण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, अशी ग्वाही अधिकार्यांनी ग्रामस्थांना दिली. (भारतात संयम पाळण्याचा सल्ला केवळ हिंदूंनाच दिला जातो, हे लक्षात घ्या ! – संपादक) पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केेले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक स्थळांची विटंबना करण्याचे धाडस हिंदुद्वेष्ट्यांना होऊ नये, एवढी वचक हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक ! |
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)