हिंद महासागरात चीनच्या कुरापतींकडे आता लक्ष ठेवता येणार !
पोर्ट लुईस (मॉरिशस) – भारताने मॉरिशस देशामधील अगलेगा द्वीपावर सैन्य तळ उभारण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. हे द्वीप मुख्य द्वीपापासून साधारण १ सहस्र १०० किलोमीटर अंतरावर असून २ द्वीपांचा हा द्वीपसमूह आहे. भारताने उभारलेल्या सैन्य तळाच्या माध्यमातून त्याला हिंद महासागर क्षेत्रात चिनी नौदलाच्या कुरापतींवर लक्ष ठेवता येणार आहे. या माध्यमातून भारताची भूक्षेत्रीय स्थितीही अधिक सशक्त होणार आहे.
सौजन्य प्रशि इन्स्टंट
१. एका माहितीनुसार अगलेगा द्वीपावर भारताने जेटी, हवाईपट्टी आणि विमानांना थांबण्यासाठी ‘हँगर’ची उभारणी केली आहे. यासह अन्यही पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.
२. भारताने या दृष्टीने अधिकृत जाहीर केलेले नसले, तरी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् १ आणि २ नोव्हेंबर या कालावधीत मॉरिशसच्या दौर्यावर आहेत. अन्य कार्यक्रमांसह ते मॉरिशसचे सूचना आणि तंत्रज्ञान मंत्री दरसानंद बालगोबिन यांच्याशी संयुक्त रूपाने एक उपग्रह विकसित करण्यावर चर्चा करून एक करार करणार आहेत.