विदेशात रहाणार्या भारतियांच्या संघटनेचे आवाहन
इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त राष्ट्रे, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांनी १० लाख अफगाणी लोकांना हाकलून देण्याच्या पाक सरकारच्या निर्णयाची निंदा केली पाहिजे. पाकिस्तानमधून अफगाणी लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया थांबवण्यात यावी, असे आवाहन ‘फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज’ या विदेशात रहाणार्या भारतियांच्या संघटनेने केले आहे.
संघटनेचे प्रमुख खंडेराव कांड म्हणाले की,
१. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाला आम्ही आवाहन करतो की, त्याने पाकला अर्थसाहाय्य करू नये. पाकचा अफगाणी लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय हा अनधिकृत आणि आंतरराष्ट्रीय मापदंडांच्या विरोधात आहे.
२. ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ क्रूर तालिबानी सरकारच्या दबावाखाली येऊन अफगाणी शरणार्थींना बलपूर्वक निर्वासित करत आहे. याने मोठ्या प्रमाणात मानवीय संकट उभे राहू शकते.
३. पाकिस्तान तालिबानबरोबर काम करत होता; कारण त्याला अफगाणिस्तानवर स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करायचे होते; परंतु आता पाकचे नियंत्रण अल्प होत चालल्याने तो निराश झाला आहे.
४. पाकिस्तान अफगाणी शरणार्थ्यांसमवेत तेच करत आहे, जे त्याने वर्ष १९४७ मध्ये अल्पसंख्यांक हिंदू आणि शीख नागरिक यांच्यासमवेत केले. अफगाणी शरणार्थींना त्रास देऊन त्यांना पळवून लावल्याने पाकिस्तान्यांना त्यांच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवता येणार आहे.
५. आम्ही पाक सरकारला आवाहन करतो की, सरकारने अफगाण शरणार्थींच्या सन्मानपूर्वक पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत.
संपादकीय भूमिका
|