पुणे विद्यापिठाशी संलग्‍न ५१३ महाविद्यालयांच्‍या कारभाराचे दायित्‍व प्रभारी प्राचार्यांवर !

अधिसभेच्‍या कामकाजात माहिती उघड !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्‍न ५१३ महाविद्यालयांचा कारभार हा प्रभारी प्राचार्यांवर चालू असून १९ महाविद्यालयांना प्राचार्यच नसल्‍याची माहिती अधिसभेच्‍या कामकाजात समोर आली आहे. यातील काही महाविद्यालयांमध्‍ये परीक्षा केंद्रांवर ‘कॉपी’चे प्रकार चालू असल्‍याने अनेक विद्यार्थी हे आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात घेत असल्‍याची माहिती सदस्‍यांनी सभागृहात दिली. अधिसभा सदस्‍य डॉ. चिंतामण निगळे यांनी महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्र, निकष, वरिष्‍ठ पर्यवेक्षकांविषयी प्रश्‍न उपस्‍थित केल्‍यावर महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांची माहिती पुढे आली आहे.

सत्र परीक्षांमध्‍ये काही परीक्षा केंद्रावर ‘कॉपी’सारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी भरारी पथकांकडून झाडाझडती घेण्‍यात येईल. त्‍याचप्रमाणे ‘कॉपी’सारखे प्रकार होऊ नयेत, तसेच महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य उपलब्‍ध होण्‍यासाठी तातडीने पावले उचलण्‍यात येतील, असे आश्‍वासन कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी दिले.