
कोल्हापूर – मिरजकर तिकटी येथे असलेल्या श्री एकमुखी दत्त देवस्थान येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत कुंकूमार्चन महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञ कालावधीत २२ ऑक्टोबरला म्हणजे अष्टमीच्या दिवशी यज्ञाच्या ठिकाणी सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती. सद्गुरु स्वाती खाडये यांनी देवीची ओटी भरून देवीला साडी अर्पण केली. या प्रसंगी देवीला अभिषेक करून कुंकूमार्चनही केले. या प्रसंगी उपस्थित साधकांना तेथे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवत होते.

या प्रसंगी श्री एकमुखी दत्त देवस्थानचे श्री. संतोष गोसावी महाराज यांसह सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री