
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – येथील ‘श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित’ यांच्या वतीने ‘अनंतव्रती’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे प्रसारक श्री. शरद पोंक्षे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना डॉ. अमित थढानी लिखित ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक भेट दिले. या प्रसंगी समितीचे सर्वश्री आदित्य शास्त्री आणि संजय मुरुकटे उपस्थित होते.
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती