कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव धर्माभिमानी हिंदूंनी हाणून पाडला !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कुडाळ : तालुक्यात एका ठिकाणी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आलेल्या ९ मिशनर्‍यांचा प्रयत्न काही जागरूक नागरिकांनी हाणून पाडला. ‘येथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत. त्यामुळे बाहेरून येणार्‍या लोकांनी येथे येऊन धर्मांतराचा प्रयत्न करू नये’, अशा शब्दांत धर्माभिमानी नागरिकांनी  ख्रिस्ती मिशनर्‍यांना खडसावले आणि त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले. कुडाळ पोलीस ठाण्यात याविषयी नोंद नव्हती; मात्र पोलिसांनी संबंधितांना समज देऊन सोडून दिल्याचे समजते.

एका आलिशान गाडीतून काही जण गावात आले होते. गावात जाण्यापूर्वी त्यांनी प्रारंभी एकत्र येऊन प्रार्थना केली. त्या वेळी तेथे असणार्‍या एका जागरूक नागरिकाने हा प्रकार पाहिला आणि त्याला संशयास्पद वाटले. त्यामुळे त्या नागरिकाने अन्य काही जणांना हा विषयी सांगितला. त्यानंतर एकत्र आलेल्या अन्य धर्माभिमानी नागरिकांनी प्रसारासाठी आलेल्या मिशनर्‍यांना खडसावले. ‘आमच्या भागात असले प्रकार चालणार नाहीत’, असेही त्यांना निक्षून सांगितले. याविषयी समजल्यावर पोलीसही घटनास्थळी आले आणि त्या मिशनर्‍यांना पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत याविषयी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद नव्हती. गेले २० दिवस हे लोक या भागात असल्याची चर्चा येथे चालू होती.

संपादकीय भूमिका

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव हाणून पाडणारे जागरूक धर्माभिमानी नागरिक सर्वत्रच्या हिंदूंसाठी आदर्श आहेत !