८.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीच्या पूजेचे सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे ८.५.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (आताच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांनी श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीची पूजा केली. या पूजेचे देवीच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कु. मधुरा भोसले

१. रिद्धी-सिद्धींच्या समवेत असणार्‍या श्री गणेशाच्या ‘महागणपति’ रूपाचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आशीर्वाद मिळणे

पूजेच्या आरंभी श्री गणेशाचे पूजन चालू असतांना रिद्धी-सिद्धींच्या समवेत असणार्‍या श्री गणेशाचे ‘महागणपति’ हे रूप कार्यरत झाले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक असणारी दैवी शक्ती रिद्धी आणि सिद्धी या देवींनी दिली अन् आवश्यक असणारी सात्त्विक बुद्धी श्री गणेशाच्या ‘महागणपति’ या रूपाने दिली. अशा प्रकारे शक्तीसमवेत असणार्‍या श्रीगणेशाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आशीर्वाद दिले.

२. स्फटिकाच्या श्रीयंत्रावर श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीचे आवाहन करणे

स्फटिकाच्या श्रीयंत्रावर श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीचे आवाहन केल्यावर प्रथम निर्गुण तत्त्वाचा पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत श्रीयंत्रावर पडला आणि नंतर श्रीयंत्रामध्ये देवीतत्त्व कार्यरत होऊन लालसर रंगाचा प्रकाश श्रीयंत्रातून बाहेर पडतांना जाणवला.

३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये देवीतत्त्व कार्यरत होणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये देवीचे सगुण तत्त्व कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावरील चकाकी वाढली आणि तो गुलाबी दिसू लागला. त्यांचे आज्ञाचक्र जागृत होऊन त्यांच्या कपाळावर देवीला प्रिय असणार्‍या कमळाची आकृती सूक्ष्मातून दिसू लागली. त्याच वेळी सद्गुरु (सौ.)अंजली गाडगीळ यांच्यामध्ये देवीचे निर्गुण तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून शांत वाटत होते.

४. स्फटिक श्रीयंत्रावर पंचामृताचा अभिषेक चालू असतांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे  !

अ. स्फटिक श्रीयंत्रावर पंचामृताचा अभिषेक चालू असतांना स्फटिक श्रीयंत्र हिमालय पर्वताप्रमाणे दिसत होते आणि त्यामध्ये देवीचे निर्गुण तत्त्व अदृश्य रूपाने कार्यरत असल्याचे जाणवले.

आ. स्फटिक श्रीयंत्राचा बुढाचा भाग सुवर्ण कमळाच्या उमललेल्या पाकळ्यांप्रमाणे दिसत होता. असे वाटत होते की, सुवर्ण कमळावर स्फटिक श्रीयंत्र विराजमान आहे. स्फटिक यंत्रामध्ये देवीचे तत्त्व कार्यरत झाल्यामुळे श्रीयंत्राच्या बुढाचा आकार देवीला प्रिय असणार्‍या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसत होता.

इ. स्फटिक श्रीयंत्रावर दुधाचा अभिषेक चालू असतांना त्यामध्ये देवीचे निर्गुण तत्त्व आकाशतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झाले. तेव्हा स्फटिक श्रीयंत्र सूक्ष्मातून श्वेत रंगाचे दिसत होते. जेव्हा स्फटिक श्रीयंत्रावर दह्याचा अभिषेक चालू झाला, तेव्हा त्यामध्ये देवीचे सगुण तत्त्व आप आणि तेज या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत झाले. तेव्हा स्फटिक श्रीयंत्र सूक्ष्मातून केशरी रंगाचे दिसत होते.

ई. स्फटिक श्रीयंत्र देवी कौशिकीच्या महालाप्रमाणे दिव्य आणि भव्य दिसत होते. नंतर ते श्रीत्रिपुरसुंदरीदेवीच्या सोन्याच्या महालाप्रमाणे दिसू लागले.

उ. ताम्हणामध्ये तरंगणार्‍या तुपाच्या गोळ्यांचा आकार श्री महालक्ष्मीदेवीच्या कलशातून पडलेल्या सुवर्ण नाण्यांप्रमाणे दिसत होता.

ऊ. स्फटिक श्रीयंत्रामध्ये देवीचा हसरा तोंडवळा दिसत होता. देवीच्या तोंडवळ्यातून प्रक्षेपित होणार्‍या आनंद लहरींमुळे साधकांची मने प्रसन्न झाली.

४ इ. पंचामृत, संबंधित पंचतत्त्व आणि श्रीयंत्रामध्ये कार्यरत देवीतत्त्व

५. पूजनाच्या ठिकाणी श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीची तीन रूपे कार्यरत होणे

कृतज्ञता

‘देवी, तुझ्या कृपेनेच श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीच्या पूजेला उपस्थित राहून त्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळेलेले ज्ञान) (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०१९)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.