ठाणे, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – भिवंडी तालुक्यात १६ वर्षीय मुलीवर ७ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी ४ नराधमांना अटक केली आहे, तर ३ जण पसार झाले आहेत. आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. पीडित मुलीला तिच्या मित्राने घरी भेटण्यासाठी बोलावून तेथे बलात्कार केला.
त्यानंतर त्याच्या अन्य मित्रांनीही बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराविषयी कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. नराधमाने पीडितेवर अत्याचार करतांनाचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले होते; मात्र काही कालावधीनंतर ते पुसून टाकण्यात (डिलीट करण्यात) आले. त्यामुळे हा प्रकार उघड झाला.
संपादकीय भूमिकानैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे ! |