कर्णावती, गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी टीका करतांना म्हटले की, भारत खिलाडूवृत्ती आणि आदरातिथ्य यांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र कर्णावती येथील सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंसमवेत करण्यात आलेली वागणूक स्वीकारार्ह नाही. खेळ दोन्ही देशांना संघटित करणारी शक्ती बनला पाहिजे, तसेच खर्या बंधूभावाला प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळाचा द्वेष पसरवणार्या शस्त्राप्रमाणे वापर करणे निंदनीय आहे.
ज्यांनी सनातन संस्कृती नष्ट करण्याचा विडा उचलला आहे, त्यांच्याकडून हिंदू दुसरी काय अपेक्षा करणार ? पाकिस्तानचे खेळाडू भारत किंवा इतर देशांतील खेळांडूशी खेळतांना धर्मयुद्धाप्रमाणे खेळतात. क्रिकेटच्या मैदानात नमाजपठण करतात, पाकिस्तान विजयी झाल्यानंतर ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देतात. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेसमवेतच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यावर रिझवान या खेळाडूने मैदानात नमाजपठण केले होते. एरव्हीही पाकिस्तानी खेळाडू असे करत असतात. तसे पाहिले, तर रिझवान याने केलेल्या कृत्याचा खेळाशी काय संबंध आहे ? यावर उत्तर न देणारे उदयनिधी स्टॅलिन कोणत्या बिळात लपलेले असतात ?
धर्मांधांच्या आक्षेपार्ह कृत्यांवर मौन का ?
‘देशात हिंदूंच्या मंदिरांवर, धार्मिक मिरवणुकांवर ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत मशिदींतून आक्रमणे होतात, तेव्हा स्टॅलिनसारखे हिंदुद्वेषी राजकीय नेते तोंड उघडत नाहीत आणि हिंदूंनी केवळ ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या, तर त्यांना पोटदुखी चालू होते. भारतातील नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा कुठे द्याव्यात आणि देऊ नयेत’, हे हिंदूंना ठाऊक आहे. हिंदुस्थानात हिंदूंनी काय करायला हवे आणि काय करू नये, हे उदयनिधी स्टॅलिनसारख्या बुद्धीवाद्यांनी हिंदूंना सांगण्याची आवश्यकता नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान हे कधीही संघटित होऊ शकलेले नाहीत. खेळ हे माध्यम भारत आणि पाक यांना कधीही संघटित करू शकत नाही. पाकिस्तानी भारतासमवेत खेळतांना त्याकडे ‘जिहाद’ म्हणूनच पहातात, याविषयी स्टॅलिन पाकिस्तानी क्रिकेटपटूंना समुपदेश का देत नाहीत ?
पुरोगाम्यांचा दांभिकपणा !
स्टॅलिन यांनी सतत हिंदू आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात वक्तव्ये करण्यापेक्षा ‘ख्रिसमस ट्री बनवण्यासाठी झाडे तोडू नका’, ‘चर्चबाहेर अनावश्यक मेणबत्त्या न जाळता गरिबांच्या घरात दिवे लावा’, ‘३१ डिसेंबरला मद्य पिऊ नका, ते पैसे गरिबांना द्या’, ‘थडग्यांवर चादरी चढवू नका, त्या भिकार्यांच्या अंगावर चढवा’, ‘ईदला मातीचा बकरा बनवून त्याची कत्तल करा’, ‘बकर्या आणि गायी यांची होणारी कत्तल थांबवा’, ‘हजयात्रेचे पैसे गरिबांना द्या’, असे घोषित केल्यास हिंदूंना अधिक आवडेल; मात्र असे बोलण्याचे त्यांचे धाडस होईल का ? अशी एकतरी चळवळ एकातरी पुरोगाम्याने कधीतरी राबवल्याचे ऐकिवात आहे का ? हा प्रकार केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करण्याचा असून तो पुरोगाम्यांचा दांभिकपणा आहे. एरव्ही सर्वधर्मसमभावाची आरोळी ठोकणारे येथे का दुजाभाव करतात ? असे प्रश्न हिंदूंनी आता या पुरोगाम्यांना विचारले पाहिजेत.
हिंदु धर्माच्या विरोधात युद्ध घोषित !
पूर्वी छुप्या पद्धतीने, तर सध्या हिंदु धर्मावर उघडपणे आघात केले जात आहेत; कारण अलीकडच्या वर्षांत हिंदु धर्माला बळकटी येत आहे. अनेक पाश्चात्त्य देशांत भारतातील योगाभ्यास, अध्यात्म, सत्संग अशा अनेक गोष्टींचा तेथील लोकांनी स्वीकार केला आहे, तसेच अनेकांनी हिंदु धर्म स्वीकारल्यामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येत आहेत. अनेक संतांच्या कार्यक्रमांत इतर पंथांतील भक्तांची संख्या वाढत आहे. नेमकी याचीच भीती धर्मद्रोही, हिंदुद्वेषी आणि पुरोगामी यांना आहे. त्यामुळे २ विशेष धर्मांनी (इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांनी) हिंदु धर्म नष्ट करण्याविषयीचे आवाहन केले आहे आणि आता स्टॅलिनसारखे राजकारणीही त्यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे हे एकप्रकारे हिंदु धर्माच्या विरोधात युद्ध घोषित केल्याप्रमाणे आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यासाठी हिंदूंनी स्टॅलिन किंवा इतर पुरोगामी यांच्या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा दिला पाहिजे.
आतापर्यंत भारतात ज्या ज्या शहरांत दंगली झाल्या, तेथे हिंदूंना मार खावा लागला आहे, तसेच या दंगलींमध्ये हिंदूंची घरे आणि त्यांची संपत्ती यांची नासधूस करण्यात आली आहे. आतंकवाद्यांच्या धमक्यांमुळे काश्मीरमधून ४ लाख ५० सहस्र हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. जे राहिले, त्या हिंदूंचा आतंकवाद्यांनी नरसंहार केला. हिंदूंवरील अत्याचारांच्या अनेक घटना आजही घडत आहेत. असे असतांना याविषयी स्टॅलिनच नव्हे, तर अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेता नासीरुद्दीन शहा, आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान, प्रकाश राज आणि कमल हसन ही मंडळी काहीच बोलत नाहीत. स्वरा भास्कर हिने तर हिंदुत्वाची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केली होती. पाश्चात्त्य देशातील युरोप आणि अरब राष्ट्रांमध्ये कुणीही ख्रिस्ती अन् इस्लाम यांच्या विरोधात वक्तव्य केल्यास त्याला लगेच चाबकाचे फटके लगावणे, चटके देणे, दगड मारणे अथवा फाशी यांची शिक्षा केली जाते; मात्र भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने देशात सर्वधर्मसमभावाची भाषा बोलून केवळ हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा र्हास करण्याचे षड्यंत्र देशातील पुरोगामी मंडळी रचत आहेत. त्यामुळे जे हिंदु धर्माच्या विरोधात सतत गरळ ओकत असतात, अशा मंडळींना देशातून हाकलून देण्याची वेळ आली आहे.