फटाके फोडल्याने ४ जण, तर दगडफेकीत १ जण घायाळ !
ठाणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – वागळे इस्टेट येथील हनुमाननगर भागात ‘शिवसाई क्रीडा मंडळ’ आणि ‘हनुमाननगर रहिवासी कमिटी’ ही २ नवरात्रोत्सव मंडळे आहेत. १५ ऑक्टोबरला ‘शिवसाई क्रीडा मंडळा’च्या मंडपाजवळ ‘हनुमाननगर रहिवासी कमिटी’चे कार्यकर्ते स्थापित करणार असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची मिरवणूक आली. तितक्यात कुणीतरी मंडपाजवळ फटाके फोडले. या घटनेवरून दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांमध्येे भांडण झाले. फटाक्यांमुळे शिवसाई क्रीडा मंडळातील ४ जण भाजले गेले. भांडणाच्या वेळी झालेल्या दगडफेकीत १ जण घायाळ झाला आहे. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, क्षुल्लक कारणांवरून भांडण्यापेक्षा सण-उत्सव यांच्या काळात एकोपा टिकवून ठेवून संघटित रहा ! |