मशिदीजवळ पोचताच विटा-दगडांचा मारा

कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथे हिंदूंच्या नवरात्री कलश यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. मशिदीजवळ जमलेल्या धर्मांधांनी कलश यात्रेवर विटा-दगडांचा मारा केला. हिंसाचाराच्या वेळी आक्रमणकर्त्यांनी ५ वर्षांच्या मुलालाही लक्ष्य केले. या प्रकरणी आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. (भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्या साम्यवादी आणि निधर्मीवादी यांना मुसलमानांची ही झुंडशाही दिसत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)
१. कुशीनगर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावातील रहिवासी नरेश शहा यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत म्हटले आहे, ‘गावात दुर्गापूजेची कलश यात्रा काढण्यात आली होती. यात्रा मशिदीजवळ पोचताच मुसलमान जमावाने ती थांबवली. तबरेज आणि त्याच्या मुसलमान साथीदारांनी यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांवर आक्रमण केले. या कलश यात्रेत महिलांचाही सहभाग होता. त्यांना शिवीगाळही करण्यात आली. आक्रमणकर्त्यांनी भाविकांवर विटा आणि दगड यांचा मारा केल्याचा आरोप आहे.
२. गावात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ४ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !