नाशिक – बाटलीत पेट्रोल दिले नाही, यासाठी पेट्रोलपंपावरील कर्मचार्यांना मारहाण करण्यात आली. दोन दिवसांत अशा स्वरूपाच्या ३ घटना घडल्या. ‘नाशिक पेट्रोल डीलर्स असोसिएशन’कडून या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांत आरोपी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी असोसिएशनने दिली आहे.