
कोल्हापूर – पुसेसावळी (जिल्हा सातारा) येथील दंगलीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी चिथावणी दिली आहे. याचसमवेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यासह संबंधित पोलीस अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी ‘एम्.आय.एम्.’ संघटनेने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन दिल्यानंतर झालेल्या ‘एम्.आय्.एम्’चे राज्य कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. (पुसेसावळी येथील दंगलीत विक्रम पावसकर यांचा सहभाग आहे, असे अद्यापतरी कुठेही पोलीस अन्वेषणात पुढे आलेले नाही किंवा पोलिसांनी अद्याप तसे काही सांगितलेले नाही. त्यामुळे ‘एम्.आय.एम्.’चे कादरी विक्रम पावसकर यांनी चिथावणी दिल्याचा आरोप कशावरून करत आहेत ? दंगल झाली की, नेहमीच हिंदूंचे नेते, पक्ष यांना लक्ष करायचे हा मुसलमानांचा जुनाच ‘कावा’ आहे ! – संपादक)
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !