नसीरुद्दीन शाह यांचा हिंदुद्वेष !

‘लव्‍ह जिहाद’ला राष्‍ट्रीय समस्‍या घोषित करून ती नाकारणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्‍यक !

अभिनेते नसीरुद्दीन शाह

ज्‍येष्‍ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दिलेल्‍या एका मुलाखतीत ‘द कश्‍मीर फाइल्‍स’, ‘द केरल स्‍टोरी’, आणि ‘गदर २’ यांसारख्‍या चित्रपटांवर टीका केली आहे. ‘द कश्‍मीर फाइल्‍स’सारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्‍याचे पाहून पुष्‍कळ त्रास होतो, तसेच बॉलिवूडमधील चित्रपटांविषयी ते म्‍हणाले, ‘आता तुम्‍ही जितके अधिक देशभक्‍त असाल, तितके अधिक तुम्‍ही लोकप्रिय व्‍हाल; कारण सध्‍या देशात त्‍याच गोष्‍टींचे राज्‍य आहे. आता केवळ तुमच्‍या देशावर प्रेम करणे पुरेसे राहिलेले नाही, तर जोरजोरात ढोल वाजवून आणि काल्‍पनिक शत्रू निर्माण करून तुम्‍हाला ते सिद्ध करावे लागत आहेे.’

सत्‍य पचनी पडेना !

‘द कश्‍मीर फाइल्‍स’, ‘द केरल स्‍टोरी’, आणि ‘गदर २’ या चित्रपटांत मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार, हिंदूंच्‍या संपत्तीची झालेली हानी यांविषयी सत्‍य विवेचन मांडण्‍यात आले आहे. खरेतर ‘मुसलमान हिंदूंवर कसे अत्‍याचार करतात ?’, ‘त्‍यांची क्रूर वागणूक कशी असते’, याविषयी या चित्रपटांतून जे दाखवण्‍यात आले आहे, त्‍याचाच त्रास हिंदुद्वेषाची कावीळ झालेले नसीरुद्दीन शाह यांना होत आहे. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यावरून त्‍यांचे मुसलमानप्रेम आणि हिंदुद्वेष प्रकट होतो. वर्ष १९९० पासून हिंदूंनी काश्‍मीर सोडावे; म्‍हणून धर्मांधांनी हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार केले, हिंदूंची घरे जाळून त्‍यांची संपत्ती नष्‍ट केली. हिंदूंच्‍या अनेक बागायती कह्यात घेतल्‍या. सहस्रो काश्‍मिरी हिंदूंची हत्‍या करण्‍यात आली. अनेक हिंदूंचे धर्मांतर केेले. काश्‍मीरमधून ४ लाख ५० सहस्र हिंदू विस्‍थापित झाले. अशी सत्‍य माहिती ‘द कश्‍मीर फाइल्‍स’ चित्रपटातून दाखवल्‍यावर नसीरुद्दीन शाह यांना पोटशूळ का उठतो ? त्‍यांनी हिंदूंवर अत्‍याचार झाल्‍याप्रकरणी धर्मांधांच्‍या विरोधात कधीही वक्‍तव्‍य केले नाही.

‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटातून ‘लव्‍ह जिहाद’ची सत्‍य माहिती दाखवण्‍यात आली आहे. ‘लव्‍ह जिहाद’चा धोका देशाला आहे; मात्र नसीरुद्दीन शाह यांनी ‘लव्‍ह जिहाद’चे समर्थन केले आहे. नसीरुद्दीन शाह यांनी अलीकडेच त्‍यांची पत्नी रत्ना पाठक यांच्‍यासमवेत झालेल्‍या विवाहाविषयी मुलाखत देतांना म्‍हटले, ‘सध्‍या देशात धर्म हेही राजकीय सूत्र बनले आहे. अशा परिस्‍थितीत ज्‍यांनी दुसर्‍या धर्माच्‍या मुला-मुलीशी विवाह केला, त्‍यांच्‍यावरही प्रश्‍न उपस्‍थित केले जात आहेत. माझ्‍या आईने कधीही रत्नाला (पत्नीला) धर्मपरिवर्तन करण्‍यास सांगितले नाही. मी एवढेच सांगू इच्‍छितो की, आमच्‍या दोन्‍ही कुटुंबांनी या विवाहाला होकार दिला. ‘२ भिन्‍न धर्मांचे लोक या देशात एकत्र राहू शकतात’, याचा हा पुरावा आहे. माझा प्रश्‍न आहे की, हे सर्व विष आले कुठून? कि फाळणीच्‍या वेळी पेरलेली द्वेषाची बिजे आजही इतकी वर्षे फुलत आहेत ?’ शाह यांना सांगावेसे वाटते की, श्रद्धा वालकर हत्‍याकांडासारखी अनेक प्रकरणे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटनांमधून घडलेली आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी त्‍यांच्‍या पत्नीला धर्मपरिवर्तन करण्‍यास सांगितले नसेल; म्‍हणून ‘लव्‍ह जिहाद अस्‍तित्‍वात नाही’, असे कसे म्‍हणता येईल ? देशात आतापर्यंत झालेल्‍या अनेक ‘लव्‍ह जिहाद’च्‍या प्रकरणांत मुसलमान पती हिंदु पत्नींना धर्मांतर करण्‍यासाठी बळजोरी करत असल्‍याचे समोर आले आहे. हिंदु पत्नींनी धर्मांतर न केल्‍यामुळे त्‍यांची हत्‍या केली जाते. यावरून हिंदु पत्नी आणि मुसलमान पती एकत्र राहू शकत नाही, हाच पुरावा आहे. याविरुद्ध नसीरुद्दीन शाह यांनी कधी आवाज उठवला आहे का ? मुळात ‘लव्‍ह जिहाद’चे विष धर्मांधांनी पेरले आहे. फाळणीपासून द्वेषाची बिजे धर्मांधच फुलवत आले आहेत. त्‍यामुळे देशात दंगली, लव्‍ह जिहाद, धर्मांतर यांसारखी अनेक प्रकरणे घडून समाजात अशांतता पसरली आहे. हे वास्‍तव नसीरुद्दीन शाह यांना नाकारता येणार नाही.

महंमद पैगंबर यांच्‍याविषयी नूपुर शर्मा यांनी विधान केल्‍यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी त्‍यांच्‍यावर टीका केली होती. शाह म्‍हणाले की, देशात जे लोक शांती आणि एकता यांच्‍या गोष्‍टी करतात, त्‍यांना कारागृहात पाठवले जाते. जे लोक नरसंहाराच्‍या गोष्‍टी करतात, त्‍यांना किरकोळ शिक्षा दिली जाते. यावर दिग्‍दर्शक विवेक अग्‍निहोत्री सडेतोड उत्तर देतांना म्‍हणाले होते, ‘‘मी नसीरुद्दीन शाह यांच्‍या विधानाशी सहमत आहे. आपल्‍याच देशात काश्‍मिरी हिंदु नरसंहाराविषयी बोलल्‍यावर शिव्‍या दिल्‍या जातात आणि बोलणार्‍यांना शिक्षा दिली जाते.’’ नागरिकत्‍व सुधारणा कायद्यावरून नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्‍यात वाद झाला होता. माजी परराष्‍ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्‍वराज यांचे पती आणि माजी राज्‍यपाल स्‍वराज कौशल हे अनुपम खेर यांचे समर्थन करत आणि शाह यांच्‍यावर टीका करत म्‍हणाले होते, ‘या देशाने तुम्‍हाला ओळख, प्रसिद्धी आणि पैसा दिला. तरीही तुम्‍ही निराशावादी आहात. तुम्‍ही कृतघ्‍न आहात. तुम्‍ही आंतरधर्मीय विवाह केला, तरीही तुम्‍हाला कुणीही एका शब्‍दाने दुखावले नाही.’ याउलट ‘अनुपम खेर जेव्‍हा बोलतात, तेव्‍हा त्‍यांच्‍या बोलण्‍यातून देशातील जनतेच्‍या वेदना प्रकट होत असतात’, असेही स्‍वराज यांनी सांगितले होते.

हिंदुद्वेषी अभिनेत्‍यांना पाकिस्‍तानात पाठवा !

हिंदू सहिष्‍णु आहेत म्‍हणून त्‍यांच्‍याविषयी काहीही बरळणे हे नसीरुद्दीन शाह यांना शोभते का ? आतापर्यंत नसीरुद्दीन शाहसारख्‍या पुरोगामी मंडळींकडून हिंदुहिताच्‍या विरोधातच बोलले जात आहे. आतापर्यंत अभिनेते नसीरुद्दीन शाह, शाहरूख खान, आमीर खान आणि सलमान खान यांनी ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात कधीही वक्‍तव्‍य केलेले नाही. उलट ‘पीके’सारख्‍या चित्रपटातून आमीर खान यांनी सरळ हिंदु धर्माची विटंबना केली आहे. या देशात सुरक्षित वाटत नसल्‍याची भावना आमीर खान यांनी व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे हे लोक भारतात राहून आणि देशाचे खाऊन देशविरोधी वातावरण निर्माण करत आहेत. भारतात असुरक्षित वाटणार्‍या लोकांना आता पाकिस्‍तानात पाठवले पाहिजे म्‍हणजे त्‍यांना भारत देश किती सुरक्षित आहे, हे तेथे गेल्‍यानंतर समजेल.