
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी असभ्य भाषेत घोषणा दिल्याच्या प्रकरणी ‘भारत मुक्ती मोर्चा’च्या अध्यक्षांसह १५० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे कसबा विधानसभाचे अध्यक्ष अमित कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. भारत मुक्ती मोर्चाकडून या वेळी शिवाजी रस्त्यावर फेरी काढली. ध्वनीवर्धकावरून फेरीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर या पुढील अन्वेषण करत आहेत.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !