चंडीगड – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या बुलडोझर मोहिमेला नुकतीच स्थगिती दिली. ब्रजमंडल जलाभिषेक शोभायात्रेवर दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनांनंतर नूंह आणि गुरुग्राम येथील वनभूमीवरील अवैध बांधकाम अन् अतिक्रमण हटवण्याची बुलडोझर मोहीम चालू करण्यात आली होती. आतापर्यंत ७५० हून अधिक अवैध झोपड्या आणि इमारती पाडण्यात आल्या आहेत.