अमेठी (उत्तरप्रदेश) – येथील आफरीन नावाच्या मुसलमान मुलीची तिचे वडील आणि भाऊ यांनी अमानुष मारहाण करून हत्या केली. ती हिंदु मुलावर प्रेम करत होती; म्हणून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची नोंद घेतली. पोलिसांनी कबर खोदून आफरीन हिचा मृतदेह बाहेर काढला आणि शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मृत मुलीचे वडील आणि भाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार ४ ऑगस्ट २०२३ या दिवशी आफरीन तिचा प्रियकर सर्वेशसोबत बाजारात बोलत होती. याविषयीची माहिती कुणीतरी आफरीनचे वडील नियामातुल्ला यांना दिली. माहिती मिळताच तिचे वडील आणि भाऊ हैदर घटनास्थळी पोचले. कसलाही विचार न करता दोघांनीही आफरीनला बेदम मारहाण केली. याविषयी माहिती मिळताच धम्मोर येथील पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी तिला आणि तिच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे आफरीनने कुटुंबियांसोबत घरी जाण्यास नकार दिला. पोलिसांनी समजुत काढल्यानंतर ती तिच्या आईसोबत घरी गेली. घरी गेल्यावर वडील आणि भाऊ यांनी तिला पुन्हा मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
20-year-old Afreen from Amethi killed by father and brother for being in a relationship with a Hindu boy, body buried to hide the truth: Exclusive FIR details
https://t.co/UoktszK06n— OpIndia.com (@OpIndia_com) August 8, 2023
संपादकीय भूमिका
|