छत्रपती संभाजीनगर येथे ‘जय श्रीराम’च्‍या घोषणेमुळे खासदार इम्‍तियाज जलील कार्यक्रम सोडून गेले !

छत्रपती संभाजीनगर – येथील छत्रपती संभाजीनगर रेल्‍वेस्‍थानकावर ६ ऑगस्‍ट या दिवशी ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेअंतर्गत पुनर्विकास कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्‍तियाज जलील उपस्‍थित होते. कार्यक्रमावेळी भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्‍या. त्‍यानंतर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण चालू होण्‍यापूर्वीच खासदार इम्‍तियाज जलील कार्यक्रमातून निघून गेले. ‘जय श्रीराम’ घोषणेवर खुलासा करतांना खासदार इम्‍तियाज जलील म्‍हणाले की, मी कशाला ‘जय श्रीराम’च्‍या घोषणेला विरोध करू ?

खासदार इम्‍तियाज जलील यांना पाकिस्‍तानात पाठवा !

भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर म्‍हणाले की, विकासाच्‍या पर्वाहात चांगली दृष्‍टी ठेवणे आवश्‍यक असते; पण कोठेतरी निषेध व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. त्‍यामुळे अशा व्‍यक्‍तींना (खासदार इम्‍तियाज जलील) या मंचावर बसवायला नको होते. यांची जागा पाकिस्‍तानच्‍याच मंचावर आहे. ‘एम्.आय.एम्.’ची जागा हिंदुस्‍थानच्‍या मंचावर नाही.