दर्यापूर (जिल्हा अमरावती) येथील धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून निवेदन
दर्यापूर (जिल्हा अमरावती) – वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धर्मियांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, अशी मागणी दर्यापूर येथील धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी एकत्रित येऊन तहसीलदारांना निवेदन देऊन केली.
या निवेदनात ‘संपूर्ण प्रकरणाविषयी केंद्रीय स्तरावर तपास व्हायला हवा, ‘वक्फ बोर्डा’ची संपूर्ण चौकशी करून अनधिकृतपणे लाटलेली सर्व भूमी संबंधितांना परत केली पाहिजे, तसेच दोषी आढळणार्यांना कठोर कारवाई केली पाहिजे’, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.