भाजपचे खासदार नरेश बंसल यांची मागणी !

नवी देहली – भाजपचे राज्यसभेतील खासदार नरेश बंसल यांनी देशाचे ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’च ठेवण्याची मागणी केली आहे.
खासदार बंसल म्हणाले की, हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत वर्ष म्हणजे देशाचा अमृत काळ चालू आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या कलम १ मध्ये संशोधन करून देशाचे नाव केवळ ‘भारत’ ठेवण्यात यावे. मागील स्वातंत्र्यादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती देण्याचे म्हटले होते. वसाहतवादाच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी भारतीय मूल्ये आणि विचार यांना लागू करण्याची आवश्यकता आहे.
सौजन्य लाईव्ह हिंदुस्तान
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळी येऊ नये. भारत सरकारने तात्काळ असा पालट करून भारतीय अस्मिता जपावी ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन