दोषींना तात्काळ अटक करण्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश !

चंद्रपूर – सोमनाथपूर वॉर्ड येथे रहाणार्या लल्ली नावाच्या व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आली होती. ही गोष्ट लल्ली यांच्या लक्षात येताच, ते भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरात शिरले. तेव्हा मागावर असलेल्या मारेकर्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार चालू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली आहे. गोळीबारानंतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे आणि कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
चंद्रपूर : राजुरा येथील घटनेतील दोषींना तात्काळ अटक करा, मुनगंटीवार यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश#Maharashtra #Updatehttps://t.co/XhJe5yx9cO
— LoksattaLive (@LoksattaLive) July 24, 2023
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या दुर्दैवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन अशा पद्धतीने अवैधरित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे आणि समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरवणारे यांवर कठोर कारवाई करावी.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद