बेंगळुरू (कर्नाटक) येथून ५ आतंकवाद्यांना अटक

मोठा घातपात करण्याचे रचले होते षड्यंत्र !

बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्रीय गुन्हे शाखेने (‘सीसीबी’ने) येथून ५ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून स्फोटके, ७ गावठी बंदुका, ४२ जिवंत काडतुसे, २ चाकू, ४ ग्रेनेड आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळून मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. सीसीबीने सांगितले की, हे ५ जण वर्ष २०१७ मधील एका हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले की, हे एक मोठे षड्यंत्र आहे. ते बेंगळुरूमध्ये बाँबस्फोटांची मालिका घडवू इच्छित होते. हे प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

संपादकीय भूमिका

भारतात विविध शहरांत आतंकवाद पसरला असून तो नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !