पोलीस जघीना याला न्यायालयात नेत असतांना झाले आक्रमण !
जयपूर (राजस्थान) – येथे अटकेत असलेल्या कुख्यात गुंड कुलदीप जघीना याची अन्य काही गुंड यांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलीस जघीना याला भरतपूर येथील न्यायालयात नेत असतांना काही गुंडांनी त्यांच्यावर आक्रमण केले. या वेळी गुंडांनी पोलिसांच्या डोळ्यांत तिखट फेकले आणि कुलदीप जघीना याच्यावर गोळ्या झाडल्या. यामुळे जघीना जागीच ठार झाला. कुलदीप जघीना याला भाजपचे नेते कृपाल सिंह जघीना यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
#Bharatpur : गैंगस्टर कुलदीप जघीना हत्याकांड, 4 मुख्य नामजद आरोपियों को पुलिस ने दबोचा@BharatpurPolice @IgpBharatpur @devendra_zee#RajasthanWithZee pic.twitter.com/5oZ9UrHcac
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) July 12, 2023
भरतपूर शहरातील एका मोठ्या भूभागावरून वाद चालू होता. कुलदीप जघीना याला ही भूमी हवी होती. या भूमीच्या व्यवहारावर कृपाल सिंह जघीना यांनी स्थगिती आणली होती. या रागापोटीच कुलदीप जघीना आणि त्याच्या साथीदारांनी कृपाल सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली होती.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने यापेक्षा वेगळे काय घडणार ? |