‘अध्यात्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत.

१. विविध योगमार्गांचे आध्यात्मिक महत्त्व !
२. विविध योगमार्गांचा कर्मावर होणारा परिणाम : ज्ञानयोगामुळे परिपूर्णता, ध्यानयोगामुळे कर्मात एकाग्रता आणि अचूकता, कर्मयोगामुळे चिकाटी आणि कृतीशीलता अन् भक्तीयोगामुळे भावपूर्णता.
३. भक्तीयोगाचे आध्यात्मिक महत्त्व : ‘भक्तीच्या माध्यमातून भगवंताशी अनुसंधान साधणे’, हे भक्तीयोगाचे वैशिष्ट्य आहे. भक्तीयोगी संतांमध्ये भगवंताविषयी भाव आणि भक्ती, सेवावृत्ती, त्याग, प्रीती, परेच्छेने वागणे, अहं अल्प असणे इत्यादी गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने आढळतात. या गुणवैशिष्ट्यांचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
४. अन्य योगमार्गियांच्या तुलनेत भक्तीमार्गी जिवाची आध्यात्मिक उन्नती लवकर होऊन त्याला लवकर संतपद प्राप्त होण्यामागील विविध कारणे !
४ अ. विविध प्रकारचे लय, संबंधित सूक्ष्म देह आणि सूक्ष्म कोश अन् लय होण्याची प्रक्रिया किती टक्के पातळीला आरंभ होते ?

टीप – वरील कोष्टकातून हे सुस्पष्ट होते की, अन्य योगमार्गांच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यामुळे जिवाचा मनोलय, बुद्धीलय, अहंलय आणि चित्तलय तुलनात्मकरित्या लवकर होतो. त्यामुळे अन्य योगमार्गियांच्या तुलनेत भक्तीमार्गी जिवाची आध्यात्मिक उन्नती लवकर होऊन तो लवकर संतपद प्राप्त करतो, उदा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश यांची सेवा इतकी भावपूर्णरित्या केली की, त्यांना ९ फेब्रुवारी १९५६ या दिवशी त्यांची गुरुभेट झाल्यानंतर त्यांना १५ फेब्रुवारी १९५६ या दिवशी गुरुमंत्र मिळाला आणि १६ फेब्रुवारी १९५६ या दिवशी प.पू. अनंतानंद साईश यांनी त्यांचे नामकरण ‘भक्तराज’ असे केल्यामुळे ते संतपदी विराजमान झाले.

४ अ. मनातील भावाच्या सूक्ष्म केंद्राचे महत्त्व : भावाचे केंद्र अनाहतचक्राच्या ठिकाणी असते. देहातील अनाहतचक्र हे मनाशी संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा भावजागृती होते, तेव्हा मनामध्ये भगवंताशी थेट अनुसंधान साधले जाते. तेव्हा भगवंताप्रतीच्या प्रीतीमय आपतत्त्वाने भारित झालेल्या भावाच्या चैतन्यलहरी संपूर्ण मनात पसरून मनाची शुद्धी होऊन मनातील रज-तम प्रधान घटक न्यून होऊन मन सात्त्विक होण्यास साहाय्य होते. त्यामुळे जेव्हा भावजागृती होते, तेव्हा व्यक्तीच्या मनाची शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू होते. अशा प्रकारे जेव्हा मनातील भावाचे सूक्ष्म केंद्र दृढ होते, तेव्हा बाह्य मन, बुद्धी, अहं आणि चित्त (सूक्ष्म मन) यांची शुद्धी होते. त्यामुळे मनोलय, बुद्धीलय, अहंलय आणि चित्तलय यांच्या लयाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन व्यक्तीचा संपूर्ण पिंड किंवा लिंगदेह अन्य योगमार्गांच्या तुलनात्मकरित्या लवकर शुद्ध होतो. अशा भक्तीमार्गी जिवाच्या शुद्ध अंत:करणात भगवंताचा नित्य वास असतो.
४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेले भावातील विविध घटक आणि त्यांचे प्रमाण

टीप – प्रार्थना, कृतज्ञता, सेवा आणि प्रीती हे घटक कृतीच्या स्तरावरील आहेत, तर आनंद आणि शांती हे परिणामस्वरूप आहेत. इतर घटकांमध्ये अष्टसात्विक भाव, म्हणजे १. स्वेद (घाम), २. स्तंभ (कुंठित होणे, थांबणे, थक्क होणे), ३. रोमांच, ४. स्वरभंग (स्वर गदगदणे), ५. कंप, ६. वैवर्ण्य (वर्ण, रंग पालटणे), ७. अश्रू आणि ८. मूर्च्छा यांचा समावेश आहे.
(क्रमशः रविवारच्या अंकात)
(संदर्भ – सनातनचा ग्रंथ : ‘भाव आणि भावाचे प्रकार’.) – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२३)
|
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !