अशा घटना रोखण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा करण्‍यासाठी दबाव आणावा लागतो, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘भाईंदर (जिल्‍हा ठाणे) येथे रहाणारे मुनव्‍वर मन्‍सुरी आणि अजीम मन्‍सुरी हे २ मुसलमान तरुण १ जून २०२३ पासून १३ वर्षांच्‍या एका अल्‍पवयीन हिंदु मुलीकडे पाहून अश्‍लील चाळे करून तिच्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्न करत होते. १२ जूनच्‍या रात्री साडेआठच्‍या सुमारास मुनव्‍वर याने मुलीला एका इमारतीच्‍या गच्‍चीत नेऊन तिचा विनयभंग केला. यानंतर पीडितेला बुरखा, साखळी आणि अंगठी दिली अन् बुरखा घालून सिद्ध रहाण्‍यास सांगितले. ‘बुरखा घालून ये. आपण पळून जाऊन लग्‍न करू’, असे त्‍याने पीडितेला सांगितले; मात्र पीडितेने त्‍यास नकार दिला. त्‍यानंतर मुनव्‍वर याने पीडितेला नकली पिस्‍तुलाचा धाक दाखवून ‘तू बुरखा घालून इस्‍लाम धर्म स्‍वीकारला नाहीस, तर गोळ्‍या घालीन’, अशी धमकी दिली. याविषयी मुलीच्‍या आईने पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली असून भाईंदर पोलिसांनी मुनव्‍वर आणि अजीम यांना अटक केली आहे.’ (१७.६.२०२३)