दौंडच्या ३ ख्रिस्ती महिला कह्यात !
अहिल्यानगर – जिल्ह्यातील दौंड येथील ३ महिलांनी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका गरीब कुटुंबाला वेगवेगळी आमिषे दाखवून ‘ख्रिस्ती धर्मात प्रवेश करा, मुलांचे विवाह होतील, घरातील समस्या दूर होतील’, असे सांगून कपाळावर तेल लावून प्रार्थना म्हटली, तसेच धर्मांतर करण्यासाठी बळजोरी केली. या प्रकरणी मयूर मदरे यांनी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी ३ महिलांवर गुन्हा नोंद केला आहे. नम्रता वारनसे (वय २७ वर्षे), शारदा सौंदडे (वय २७ वर्षे) आणि वैशाली पवार (वय ३६ वर्षे) अशी पोलिसांनी कह्यात घेतलेल्या ख्रिस्ती महिलांची नावे आहेत. (बाटगे ख्रिस्ती धर्मांतर करूनही त्यांचे हिंदु पालटत नाहीत; कारण त्यांना हिंदु समाजामध्ये राहून अन्य हिंदूंचे धर्मांतर करायचे असते, हे लक्षात घ्या. असे बाटगेच हिंदु समाजासाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)
नगर जिल्ह्यामध्ये कपाळावर तेल रगडत धर्मांतर; ३ ख्रिश्चन महिलांवर गुन्हा दाखलhttps://t.co/6oQGC1yGqO
— Nagar Sahyadri (@enagarsahyadri) June 18, 2023
काष्टी येथे प्रकाश मदरे (२० वर्षे) हा तरुण आई आणि भावासह रहातो. त्याच्या घरी जाऊन या ३ महिलांनी वरील प्रकारे धर्मांतराचा प्रयत्न केला. ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे सांगूनही त्या महिलांनी ‘तुम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली नाही, तर तुमचे वाईट होईल’, असे सांगितले. (हिंदु धर्मातील देवाची प्रार्थना केल्यावरही भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. ख्रिस्ती पंथाप्रमाणे प्रार्थना केल्यावर सर्व संकटे दूर होतात, तर मग विदेशात अनेक चर्चे ओस का पडू लागली आहेत ? अनेक ख्रिस्त्यांनी चर्चमध्ये जाणे का बंद केले आहे, याचे उत्तर ख्रिस्ती महिलांनी द्यावे ! – संपादक) प्रकाश यांनी याविषयी प्रतीक पाचपुते यांना बोलावून या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी महिलांकडे चौकशी केल्यावर त्यांच्या बोलण्यात काही संशयास्पद गोष्टी आढळल्यामुळे पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.