
पुणे – भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्यम् स्वामी हे १५ जून या दिवशी पुण्यातील पालखी सोहळ्यात सहभागी झाले. डॉ. सुब्रमण्यम् स्वामी हे पुरंदरमध्ये आले होते. या वेळी सासवड येथे एका दिंडीमध्ये सहभाग घेत टाळ-मृदंगाच्या तालावर त्यांनी ठेका धरला. या वेळी त्यांच्या समवेत पुरंदरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे हेही उपस्थित होते. सासवडमध्ये माऊलींची पालखी ज्या ठिकाणी विसाव्याला थांबली होती, तिथे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. या वेळी सुब्रमण्यम् स्वामी आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. दोघांमध्ये काही काळासाठी चर्चाही झाली.
#AshadhiWari2023 सुब्रमण्यम स्वामींनी अनुभवला वारी सोहळा; टाळ, मृदुंगांच्या तालावर धरला ठेका #pandharpurwari #SubramanianSwamy https://t.co/wQyBm56O2i
— ABP माझा (@abpmajhatv) June 15, 2023
यानंतर त्यांनी पालखीतळावर जाऊन माऊलींच्या पालखीचे दर्शनही घेतले. ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसावा आहे. त्या विसाव्याच्या स्थळाला त्यांनी भेट दिली. तिथे काही काळ त्यांनी वारकर्यांसह घालवला. या वेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याविषयीची त्यांनी माहिती घेतली.
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan